Ad will apear here
Next
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’


पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित ‘सर्वांसाठी आरोग्य’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

या वेळी मनोविकास प्रकाशनतर्फे आरोग्य कार्यकर्ता म्हणून परिचित असलेल्या डॉ. अनंत फडके लिखित ‘सर्वांसाठी आरोग्य? होय शक्य आहे!’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सुपे आणि दोंडाईचा येथील ज्येष्ठ शैल्यविशारद व असोसिएशन ऑफ रुरल सर्जन्स ऑफ इंडियाचे संस्थापक व माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र टोणगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

‘सर्वांसाठी आरोग्य’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलताना डॉ. सुपे म्हणाले की, ‘आज आपल्या देशात सार्वजनिक वाहतूक आणि इतर विषयांसाठी पैसे खर्च करण्याची सरकारची तयारी असलेली दिसून येते; मात्र हेच सरकार सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण यांकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा करीत असल्याचे पहायला मिळते. ही परिस्थिती बदलने आज महत्त्वाचे आहे. याबरोबरच तमिळनाडूसारख्या राज्यात तीन रुपये किंमतीचे औषध सरकार आठ पैशांना उपलब्ध करून देत असलेले आपण पाहतो. हे मॉडेल लक्षात घेत इतर राज्यातील सराकरनेही त्याचे अनुकराण करावे जेणेकरून सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न काही अंशी सुटायला मदत होईल.’       

‘आज बाजारात रोज नव्याने अनेक लस येत असतात; मात्र रुग्णांना त्या लसींची उपयुक्तता किती प्रमाणात आहे व त्या लसींचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो याचा विचार न करता ती लस रुग्णांना देण्याचा आग्रह डॉक्टरांनी धरणे बरोबर नाही,’ असे मत डॉ. टोणगावकर यांनी व्यक्त केले.

डॉ. फडके म्हणाले, ‘जेनरिक औषध म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात भांडणे लावण्याचा प्रकार आहे. मी स्वत: या जेनेरिक औषधांचा पुरस्करता असूनही मी ती रुग्णांना लिहून देत नाही. कारण कोणत्याही औषध दुकानात जेनरिक नावांनी ती औषधे उपलब्धच नाहीत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने औषधांचे ‘ब्रॅंड’ बंद करून जेनरिक नावांनी औषधे बाजारात आणण्यात सरकारने पुढाकार घ्यावा, असे मला वाटते.’

या वेळी डॉ. श्रीराम गीत, उल्हास सावंत यांनी पाहुण्यांशी संवाद साधला. अरविंद पाटकर यांनी प्रस्तावना केली. डॉ. अभिजित मोरे यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZORBO
Similar Posts
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद पुणे : ‘न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्ते-गुबार हूँ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे, मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादूरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी व्यक्त केली.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील
‘सूर नवा ध्यास नवा’च्या ऑडिशन्सला पुणेकरांचा प्रतिसाद मुंबई : ‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा– छोटे सुरवीर’ या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूरनंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language